अमळनेरात छत्रपती संभाजी महाराज जयंतीदिनी प्रबोधनपर कार्यक्रम..
छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे कार्यक्रमाचे आयोजन
अमळनेर (प्रतिनिधि) छत्रपती क्रांती सेना आणि राष्ट्रीय ओबीसी मोर्चा तर्फे अमळनेर येथे विचार प्रबोधन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा चे राष्ट्रीय संयोजक अध्यक्ष मा.वामन मेश्राम यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम होणार आहे.सदर कार्यक्रमात १.छत्रपती संभाजी महाराजांची हत्या मोगलांनी केली तर पेशवाई कशी आली?
२.ईव्हीएम मशीनने लोकशाहीची हत्या करून ब्राह्मण शाही लागू केली एक चर्चा ३. खाजगीकरण व नवीन शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून बहुजन समाजाचे शिक्षण व नोकरी मधील आरक्षण समाप्त केले जात आहे एक गंभीर चर्चा या तिन्ही विषयावर वामन मेश्राम उद् बोधन करणार आहेत.
सदर कार्यक्रम रविवार दिनांक १४ मे रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधलीपुरा येथे आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष नानासाहेब डी.डी पाटील हे आहेत. यावेळी मा. प्रा. शिवाजीराव पाटील (राष्ट्रीय उपाध्यक्ष, राष्ट्रीय किसान मोर्चा) प्रा.अशोक पवार (अध्यक्ष’ युवा कल्याण प्रतिष्ठान),मा. प्रा. डॉ. राहुल निकम (समाजकार्य महाविद्यालय जळगाव) श्याम पाटील (मा.नगरसेवक, न.पा.अमळनेर) शिवव्याख्याते मा. रामेश्वर भदाणे आदी मान्यवर प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमास तालुक्यातील व शहरातील तमाम पुरोगामी संघटनांनी व सर्व समाज बांधवांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केलेले आहे.
