अमळनेर अर्बन बँकेसाठी एवढे अर्ज .. उमेदवार व त्यांचा समर्थकांचे माघारीकडे लक्ष…

0
New-Doc-05-12-2023-11.01.jpg

अखेरच्या दिवसापर्यंत ४७ जणांनी भरले ८६ अर्ज

अमळनेर (प्रतिनिधी):-येथील अमळनेर अर्बन बँकेच्या नामांकन दाखल करण्याचा अखेरच्या दिवसापर्यंत १३ जागांसाठी ४७ उमेदवारांनी एकूण ८६ अर्ज दाखल केले आहेत. यात सर्वसाधारण मतदारसंघातील ८ जागांसाठी १९ उमेदवारांचे ४० अर्ज दाखल झाले असून यात प्रदीप अग्रवाल, तिलोत्तमा चुडामन पाटील, सुनील पाटील,चंद्रकांत शर्मा,संभाजी पाटील, लक्ष्मण महाजन, लालचंद सैनानी, दीपक साळी,राकेश मुंडदे, प्रवीण जैन,अभिषेक पाटील, प्रवीण पाटील,भरतकुमार ललवाणी, पंकज मुंदडे, नंदू पाटील, प्रकाश महाजन,संदीप पाटील,महेश पाटील,सुरेश पाटील तर महिला राखीव मतदारसंघातील २ जागांसाठी ४ जणांनी ११ अर्ज आहेत यात, तिलोत्तमा पाटील,डॉ.मनीषा लाठी,वसुंधरा लांडगे, मिराबाई निकम यांचे अर्ज दाखल झाले आहेत. इतर मागासवर्गीय मतदारसंघातिल एका जागेसाठी ९ जणांचे १३ अर्ज आले आहेत यात लक्ष्मण महाजन, पंडित चौधरी,प्रकाश महाजन, मिलिंद कासार,देविदास पाटील,महेश पाटील, अधिकार पाटील,बापू चौधरी, संदीप पाटील यांचे तर

अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात एका जागेसाठी १२ जणांचे १७ अर्ज आहेत यात रघुनाथ मोरे, राजूसिंग परदेशी,रणजीत शिंदे,नरेश कांबळे,सोमचंद संदानशिव,सरिता ठाकूर, संजीव संदानशिव,
गुणवंत वाघ,देवेंद्र कांबळे, शिवकुमार ससाने,साहेबराव शेजवळ,नथू ठाकूर तर विजाभज मतदारसंघातील एका जागेसाठी रणजीत पाटील,मोहन सातपुते,उमाकांत धनराळे या तिघांनी ४ अर्ज दाखल केले आहेत.
उमेदवार व त्यांच्या समर्थकांचे आता माघारीकडे लक्ष लागून राहिले आहे.काही जागा बिनविरोध होऊ शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed