आर्वी कब्रस्थान कुंपणभिंत व काँक्रिट रस्ता कामाचा आ.फारुख शाह यांचे हस्ते शुभारंभ…
धुळे (अनिस अहेमद) – धुळे तालुक्यातील आर्वी गावातील कब्रस्थानची अवस्था अत्यंत बिकट झालेली होती.आर्वी गावातील नागरिकांच्या मागणीनुसार कब्रस्थान कुंपनभिंत आणि काँक्रिट रस्ता तयार करणे या कामाचा शुभारंभ आ.फारुख शाह यांचे शुभहस्ते करण्यात आला.
आर्वी गावाची गरज लक्षात घेवून आ.फारुख शाह यांनी ग्रामविकास विभागाकडून कब्रस्थानच्या कामासाठी २६लक्ष रुपये मंजूर करून आणले. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत काम केले जाणार आहे.शुभारंभ कार्यक्रमप्रसंगी सरपंच नागेश देवरे उपसरपंच विठोबा देवरे,डॉ.दिपश्री नाईक,डॉ.बापुराव पवार,पंचायत समिती सदस्य जिभाऊ शेनगे, एड.मिलिंद बाविस्कर, ग्रामपंचायत सदस्य सत्तू सोनवणे,गजानन खैरनार,माचींद्रा गर्दे,विनायक केले,रुबाब पिंजारी,नामदेव चौधरी,सरदार पिंजारी,साबीर पिंजारी,सत्तार खाटीक,शकील खाटीक,तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता धर्मेंद्र झाल्टे, किरण पवार आदी उपस्थित होते..
