मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली..

0
New-Doc-04-08-2023-20.48.jpg

24 प्राईम न्यूज 9 एप्रिल शुक्रवारी पहाटे मुंबई पोलिसांना सतर्क केले आहे. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षात तीन अतिरेकी मुंबईत आल्याचा फोन आल्याने खळबळ उडाली आहे. या तिघांचा पाकिस्तानी संबंध असल्याचा दावाही करण्यात आला आहे.
मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात राजा ठ नावाच्या एका व्यक्तीने फोन करून ही माहिती दिली. त्याने यापैकी एका व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि गाडीचा नंबरही पोलिसांना दिला आहे. या तिघांचाही बेकायदेशीर व्यवसाय असल्याची माहिती राजा यांनी दिली आहे. यापैकी एकाचे नाव मुजीब सय्यद असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. या आधारावर पोलीस सध्या अधिक तपास करत आहेत. दुबईवरुन शुक्रवारी पहाटे हे तीन अतिरेकी भारतात आल्याचं राजा ठोंगे यांनी म्हटलं आहे. तसंच यांचा पाकिस्तानशी संबंध असल्याचा दावा त्यांनी केला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed