पोलीस मुख्यालय येथील शहीद स्मारक व काँक्रीट रस्ते व गटार बांधकामासाठी ३ कोटी रुपये मंजुर..!
— आमदार फारुख शाह यांच्या पाठपुराव्याची फलश्रुती..!

0
PhotoScanner_1679742506092.jpg

धुळे (अनिस अहेमद) शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी पोलीस वसाहत असून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गैरसोयी आहेत.सर्व भागात घाणीचे साम्राज्य पसरले आहेत संपूर्ण वसाहतीच्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी गटारी अस्तित्वात नाही परिणामी संपूर्ण पाणी हे लगतच्या मैदानात साचते त्यामुळे परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरलेली आहे. या मुळे रोगराई पसरली आहे सातत्याने पोलीस व पोलीस परिवारातील सदस्य यामुळे साथीच्या आजाराचे बळी ठरत आहेत. संपूर्ण वसाहतीमध्ये रस्त्यांची दुरवस्था झालेली अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने नवीन रस्ते व गटारी करणे अत्यंत गरजेचे आहे.
पोलीस मैदानात शहिद स्मारकांची अवस्था बिकट झालेली आहे. शहिद स्मारक नव्याने बांधण्यासाठी मा.पोलीस अधीक्षक यांनी जागा उपलब्ध करून दिली असून त्याबाबतचे नाहरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. तरी पोलीस वसाहतीत शहीद स्मारक, कॉंक्रीट रस्ते व गटारी बांधण्यासाठी आमदार फारुख शाह यांनी दि.२३/०८/२०२१ रोजी तत्कालीन गृहमंत्री यांना याबाबत ६ कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याअनुषंगाने सार्वजनिक बांधबांधकाम विभाग यांनी परिपुर्ण प्रस्ताव तयार करून धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यामार्फत पोलीस महासंचालक यांच्याकडे पाठविला होता. त्यानुसार महाराष्ट्र शासन गृहविभागाला प्राप्त अर्थसंकल्पीय निधीतून ३ कोटी रुपये मंजुर करण्यात आले आहेत. लवकरच यासंदर्भात निविदा प्रक्रिया होवून कामास सुरुवात होणार आहे. याबाबत आमदार फारुख शाह यांचे पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी आभार मानले आहे. शहरातील पोलीस कर्मचारी वसाहत असो किवा जजेस क्वॉटर असो तसेच जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचे व प्रशिक्षणार्थी डॉ.वसतिगृह यासाठी सुद्धा आमदार फारुख शाह यांनी करोडो रुपयाचा निधी शासनाकडून मंजुर करून आणलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed