महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत मोठी भरती;

0
New-Doc-2023-03-16-07.39.25_1.jpg

24 प्राईम न्यूज 16 मार्च 2023
पदवीधरांना ३७ हजारांपेक्षा जास्त पगाराची मिळणार नोकरी
भरतीसाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सर्व आवश्यक माहिती जाणून घ्या.

MAHAGENCO Recruitment 2023
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी

MahaGenco / Mahanirmiti Bharti 2023: महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित (MAHAGENCO) येथे काही जागांसाठी भरती करण्यात येणार आहे. या जागांबाबतची अधिसूचना कंपनीकडून जारी करण्यात आली आहे. त्यानुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना http://www.mahagenco.in या वेबसाइटवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा याबाबतची सर्व माहिती जाणून घेऊया.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी लिमिटेडमध्ये अधिकारी, सहाय्यक अधिकारी, महाव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. पदांनुसार अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल २०२३ अशी असेल. इच्छुक उमेदवारांनी भरतीबाबतच्या अधिकच्या आणि सविस्तर माहीतीसाठी https://mahasarkar.co.in/mahagenco-recruitment/ या लिंकला भेट द्यावी.
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित भरती २०२३
पदाचे नाव – अधिकारी, सहाय्यक अधिकारी, सरव्यवस्थापक, सेवानिवृत्त अभियंता.
एकूण जागा – ५५

नोकरी ठिकाण – महाराष्ट्र
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची सुरुवात – ८ मार्च २०२३
अर्ज करण्याची शेवटची तारीख – १७, ३१ मार्च आणि १० एप्रिल प्रत्येक पोस्टनुसार या तारखा वेगवेगळ्या आहेत. कंपनीच्या बेवसाईवर याबाबतची अधिकची माहिती जाणून घ्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed