मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती! अमळनेरात जयनिल फाऊंडेशनच्या शाडू माती गणपती कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संदेश समाजात रुजविण्याच्या उद्देशाने जयनिल फाऊंडेशन, अमळनेर यांच्या वतीने मराठा मंगल कार्यालय येथे तालुकास्तरीय शाडू माती गणपती कार्यशाळा व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ‘मातीचा गणपती, पर्यावरणाची खरी भक्ती’ या संदेशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


कार्यशाळेत विद्यार्थ्यांना शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती साकारण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे जलप्रदूषण टाळून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. विद्यार्थ्यांनी कल्पकता व कलाकौशल्याचा वापर करत आकर्षक गणेशमूर्ती साकारल्या.


आमदार अनिल पाटील यांची उपस्थिती
या उपक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या हस्ते झाले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत कार्यशाळेतील विविध मूर्तींची पाहणी केली. संपूर्ण वेळ उपस्थित राहून त्यांनी विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. विद्यार्थ्यांचा उत्साह पाहून “या उपक्रमामुळे माझ्या बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला,” अशी भावना आमदार अनिल पाटील यांनी व्यक्त केली.
स्पर्धेतील विजेते
स्पर्धा बाल गट (इयत्ता १ ली ते ७ वी) आणि खुला गट अशा दोन गटांत घेण्यात आली.
बाल गट :
प्रथम – लावण्या काशिनाथ पाटील
द्वितीय – श्रद्धा रविंद्र कदम
तृतीय – जीविका राजेंद्र पाटील
चौथा – आर्या जितेश पाटील
पाचवा – कृतिका वैभव पवार
खुला गट :
प्रथम – जयेश धनंजय हडप
द्वितीय – हर्षवर्धन महेंद्र वाघ
तृतीय – अनुष्का एकनाथ पाटील
चौथा – कृतिका समाधान पारधी
पाचवा – जानवी रवींद्र पाटील
दोन्ही गटांतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यांना ३ हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला २ हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाला १ हजार रुपये अशी रोख बक्षिसे देण्यात आली. तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
हा उपक्रम जयनिल फाऊंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील व उपाध्यक्ष वरूण राजेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.
यावेळी जिल्हा परिषद सदस्या जयश्री अनिल पाटील, सरपंच राजश्री राजेश पाटील, संजय पुनाजी पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष चेतन राजपूत, जितू ठाकूर, किरण पाटील, पांडुरंग पाटील, विनोद कदम, राजेश पाटील, महेश पाटील, डॉ. बाविस्कर दांपत्य, गणेश भामरे, भूषण भदाणे, शेलकर सर, दुर्गेश पाटील यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी व जयनिल फाऊंडेशनची संपूर्ण टीम उपस्थित होती.
शाडू मातीच्या गणेशमूर्ती निर्मितीतून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देतानाच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा हा उपक्रम अमळनेरात चर्चेचा विषय ठरला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed