अमळनेरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न पोलिसांचा खबरी असल्याच्या संशयातून पाठलाग करून मानेवर वार करण्याचा प्रयत्न; दादू धोबीला अटक.
अमळनेर/आबिद शेख

परेश रवींद्र उदेवाल (वय २८, रा. राजारामनगर, शिरूड नाका, अमळनेर) हा रात्री गांधलीपुरा भागातून पायी जात असताना अचानक दादू धोबी त्याच्या समोर आला. त्याने परेशला अश्लील शिवीगाळ करत, “तू पोलिसांचा खबरी आहेस, तुझ्यामुळे मला त्रास होत आहे,” असे म्हणत कोयता काढून त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी दादू धोबी नागरिकांवरही कोयता उगारून धमक्या देत असल्याने नागरिकांनी त्याला पकडून मारहाण केली. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते व पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

या प्रकरणी पोलिसांनी दादू धोबीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

