दागिने घडवणाऱ्या रवि ज्वेलर्सकडून भविष्य घडवणाऱ्या हातांचा सन्मान.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून रवि ज्वेलर्स, अमळनेर यांच्या वतीने शहरातील विविध शाळांमधील शिक्षक व कर्मचारी वृंदाचा अनोख्या पद्धतीने सन्मान करण्यात आला. शिक्षकांच्या कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करणाऱ्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Oplus_131072

या उपक्रमात प्रताप ज्युनिअर कॉलेज, साने गुरुजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय, ग. स. हायस्कूल, डी. आर. कन्या शाळा, पी. बी. ए. इंग्लिश मीडियम स्कूल, श्री एन. टी. मुंदडा ग्लोबल स्कूल तसेच सेंट मेरी स्कूल-मंगरूळ आदी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व कर्मचारी सहभागी झाले.
शिक्षक हा केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान देणारा व्यक्ती नसून त्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा आणि व्यक्तिमत्त्वाला आकार देणारा मार्गदर्शक असतो. अक्षरज्ञानापासून ज्ञानापर्यंत, ज्ञानापासून संस्कारांपर्यंत आणि संस्कारांपासून उज्ज्वल भविष्यापर्यंतचा प्रवास घडविण्यात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.


याच भावनेतून रवि ज्वेलर्सतर्फे शिक्षकांना पेन, मनःपूर्वक शुभेच्छापत्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. शिक्षकांच्या हातातील पेन हे केवळ लेखनाचे साधन नसून, अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारे प्रभावी माध्यम आहे, या विचारातून या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली.
“आम्ही दागिने घडवतो; मात्र समाजाचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांच्या हातांचा सन्मान करणे, ही आमच्यासाठी अभिमानाची आणि मनापासूनची भावना आहे,” असे रवि वर्मा व निखील वर्मा यांनी सांगितले.
शिक्षकांच्या योगदानाला सलाम करणाऱ्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे शिक्षक व कर्मचारी भारावून गेले. सामाजिक बांधिलकी जपत शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम अमळनेरकरांसाठीही प्रेरणादायी ठरला

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed