अमळनेरमध्ये मराठा समाज महिला मंडळाची उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धा; गुणवंत महिलांचा सन्मान.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : अमळनेर तालुका मराठा समाज महिला मंडळाच्या वतीने समाजातील गुणवंत व हौशी महिलांना व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने अचानक दिलेल्या विषयांवर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून स्पर्धकांनी प्रभावी भाषणातून आपले वक्तृत्व कौशल्य सिद्ध केले.

स्पर्धेत जयश्री पवार यांनी प्रथम क्रमांक पटकावला, तर सीमा पाटील यांनी द्वितीय आणि स्वाती पाटील यांनी तृतीय क्रमांक मिळविला. उत्तेजनार्थ पुरस्कार रेखा मराठे व अपेक्षा पाटील यांना प्रदान करण्यात आला.
स्पर्धेत आशा पाटील, पूजा पाटील, श्वेता पाटील, शोभा पाटील, रजुताई सूर्यवंशी, मंगलाबाई पाटील, प्रतिभा शिसोदे, मनीषा पाटील, उर्मिला पाटील, प्रियदर्शनी भोसले, माधुरी पाटील आणि योगिता सूर्यवंशी यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. जयश्री पाटील होत्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्षा सौ. सुलोचना वाघ यांनी केले. सूत्रसंचालन सौ. गायत्री भदाणे व सौ. स्वप्ना पाटील यांनी केले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून सौ. भारती (आक्का) पाटील व सौ. भारती पाटील यांनी जबाबदारी पार पाडली.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी मंडळाच्या संचालिका मंगला पाटील, सुनीता पाटील, लीना पाटील, पद्मजा पाटील, माधुरी पाटील, मनीषा पाटील, प्रभावती पाटील, राजश्री पाटील, कृपाली पाटील आणि नलिनी पाटील यांनी विशेष परिश्रम घेतले.
या वक्तृत्व स्पर्धेला महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या. स्पर्धेमुळे महिलांमधील वक्तृत्वकला, आत्मविश्वास आणि सामाजिक विषयांवरील विचार मांडण्याची क्षमता विकसित होण्यास चालना मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
