शेतकरी हितासाठी आम आदमी पार्टीचा रस्ता रोको!
शेतीमालास कवडीमोल भाव देणाऱ्या व्यापारी धार्जिण्या मोदी सरकारचा निषेध !
आम आदमी पार्टीने अमळनेर चौबारीत रस्तारोको करून वेधले लक्ष!!

0
IMG-20230304-WA01052.jpg


अमळनेर (प्रतिनिधि)जिल्हाध्यक्ष प्रा तुषार निकम यांचे मार्गदर्शनाखाली आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी अमळनेर तालुक्यातील चौबारी गावाजवळ रस्ता रोको आंदोलन करून रस्ता

बंद करून मोदी व मिंधे-फडणवीस सरकारचा निषेध नोंदवला.
रस्ता अडवून करून शेतकऱ्यांच्या मालाला कवडीमोल भाव देणाऱ्या सरकार विरोधात आक्रोश करण्यात आला.. मात्र याच वेळी परीक्षा कामी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना मात्र वाट मोकळी करून देण्यात आली.
आम आदमी पार्टीचे महाराष्ट्र राज्य सचिव शिवाजी दौलत पाटील अमळनेर तालुका अध्यक्ष संतोष पाटील, स्वप्निल पाटील, नारायण पाटील, महिला तालुका अध्यक्ष मनीषा पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गणेश पवार, रामकृष्ण देवरे, बाळू पाटील, मुकेश राजपूत, रियाज बागवान, सलीम शेख, नाना पाटील, राजेंद्र पाटील, नाना पाटील, महेंद्र साळुंखे, कल्याण पाटील, मधुकर पाटील, पंचक्रोशीतील आलेले सर्व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चौबारी,पाडसे, खर्दवासरे, बामणे खर्दे, व परिसरातील सर्जेराव पाटील, बाळासाहेब पाटील,बाळू चैत्राम पाटील, धनराज पाटील, नरेंद्र पाटील, दिपक पाटील, रवींद्र पाटील, भैया पाटील, प्रवीण पाटील, चंद्रशेखर पाटील, रवींद्र पाटील, मनोज पाटील, विनोद पाटील, बारकू पाटील, दिनेश पाटील, नंदू पाटील, उमाकांत ठाकूर आदी सहभागी झाले होते.
शेतकरी हितासाठी लक्षवेधी आंदोलन करून प्रशासनाच्या वतीने तलाठी यांनी निवेदन स्वीकारले अशी माहिती धनंजय सोनार यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
मारवड पोलीस ठाण्याचे खलाने व पोलिसांनी बंदोबस्त ठेवून परिस्थिती हाताळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed