रील काढण्याच्या नादात दोन तरुणांचा दुर्दैवी मृत्यू..

0
New-Doc-10-26-2025-16.43.jpg

24 प्राईम न्यूज 26 Oct 2025
पाळधी :पाळधी-चांदसर रेल्वे गेटजवळ आज दुपारी भीषण अपघात झाला. रील काढण्याच्या नादात दोन तरुण आमदाबाद एक्सप्रेसखाली येऊन ठार झाले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत तरुणांची नावे हर्षल ननवरे व प्रशांत खैरनार अशी असून त्यांचे वय अनुक्रमे १७ व १८ वर्षे आहे. दोघेही पाळधी रेल्वे गेटलगतच्या प्लॉट परिसरातील रहिवासी असल्याचे समजते.

घटनेची माहिती मिळताच पाळधी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. रेल्वे रुळांवर रील काढण्याच्या प्रयत्नात झालेल्या या अपघातामुळे सोशल मीडियाच्या अतिरेकाबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed