अमळनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना पावसामुळे झालेल्या नुकसानीची नुकसानभरपाई द्यावी – शिवसेना (उध्दव ठाकरे)
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील अनेक गावांत 15 व 16 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे नुकसान झाले आहे. पुराच्या पाण्याने शेती बुडाल्याने पिके जमीनदोस्त झाली असून, जमिनीची सुपीक माती वाहून गेल्याने शेतजमिनी नापीक झाल्या आहेत. जुलै महिन्यात पाऊस न झाल्याने आधीच पिके करपली होती, त्यात आता पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उध्दव ठाकरे गट) तर्फे अमळनेर तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ई-पीक पाहणीची अट रद्द करून सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
नुकसानभरपाईबाबत तातडीने कार्यवाही न झाल्यास शिवसेना उग्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
निवेदनावर शहर प्रमुख चंद्रशेखर भावसार, युवा सेना तालुका प्रमुख राजेंद्र मराठे, विधानसभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब पवार, शहर संघटक मोहन भोई, उपतालुका प्रमुख रवींद्र पाटील, विलास पवार, बाळासाहेब पाटील, भय्या पाटील, माजी जिल्हा प्रमुख कारभारी आहेर, उपजिल्हा प्रमुख देवेंद्र देशमुख, शाखा प्रमुख मुस्ताक बागवान, युवा सेना उपतालुका प्रमुख गोकुळ कोळी, विजय पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 101000/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 93000/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 76800/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1170/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
