अवघ्या 12 तासांत अमळनेर पोलिसांचा पराक्रम!मोटरसायकल चोराला धुळे येथे शिताफीने पकडले.

0
New-Doc-07-25-2025-23.37.jpg

अमळनेर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत
ोटरसायकल चोरी प्रकरणी चोरट्याला गजाआड करून कौतुकास्पद पराक्रम केला

आबिद शेख/अमळनेर दिनांक 22 जुलै 2025 रोजी दुपारी 1.00 ते 2.30 वाजेच्या सुमारास सद्दाम हुसेन, रा. चिकाटे गल्ली, अमळनेर यांच्या राहत्या घरासमोर उभी असलेली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल (क्रमांक MH 19 AS 3590) अज्ञात चोरट्याने लांबवली होती. सदर तक्रार पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांच्याकडे दाखल होताच तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आले.

पोलीस उपनिरीक्षक नामदेव बोरकर, हेडकॉन्स्टेबल मिलिंद सोनार, कॉन्स्टेबल निलेश मोरे, विनोद संदानशिव व उदय बोरसे यांच्या पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून उपयुक्त धागेदोरे मिळवले. गोपनीय बातमीदारांना सतर्क करून धुळे शहरात शोधमोहीम राबविण्यात आली.

धुळे येथील पांझरा नदीकाठावर अंजन शाह बाबा दर्गा परिसरात पथकाने संशयित आरोपी अरशद अकबर शहा (वय 19, रा. भोला बाजार, 80 फुटी रोड, धुळे) याला शिताफीने ताब्यात घेतले. पोलिसी चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दोन दिवसांच्या पोलीस कस्टडीत त्याच्याकडून चोरी केलेली मोटरसायकल जप्त करण्यात आली ही कारवाई जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. महेश्वरी रेड्डी, उपविभागीय पोलिस अधिकारी अमळनेर श्री. विनायक कोते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच अमळनेर पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री. दत्तात्रय निकम यांच्या आदेशानुसार करण्यात आली.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 99100/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 91100/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75300/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1175/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed