“भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार २०२५” पत्रकार आबिद शेख यांना जाहीर..

0
IMG-20250720-WA0046.jpg

24 प्राईम न्यूज 20 Jul 2025

अमळनेर – ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने दिला जाणारा “भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय गौरव पुरस्कार – २०२५” यंदा अमळनेरचे पत्रकार आबिद शेख यांना जाहीर

श्री. आबिद शेख यांचे समाजकारण व पत्रकारितेतील योगदान अत्यंत उल्लेखनीय राहिले असून, त्यांच्या कार्याच्या सामाजिक प्रभावाची दखल घेत त्यांना राष्ट्रीय समाजभूषण / जीवन गौरव पुरस्कार २०२५ देण्यात आला आहे.

पुरस्कार प्रदान करताना आयोजकांनी नमूद केले की –
आबिद शेख यांचे कार्य सामाजिक जाणिवा जागवणारे, प्रेरणादायी आणि सत्याच्या मार्गावर चालणारे आहे. त्यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब त्यांच्या पत्रकारितेच्या कार्यात दिसते. ते नव्या पिढीला दिशा देणारे व्यक्तिमत्त्व आहेत.”

श्री. आबिद शेख यांना मिळालेला हा राष्ट्रीय सन्मान त्यांच्या कार्यक्षमतेचे व ध्येयधोरणाचे कौतुक असून, अमळनेर परिसरासाठीही ही एक अभिमानास्पद बाब ठरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed