मांडळ ते वावडे रस्त्याची दुर्दशा; रोज ये-जा करणाऱ्यांचे हाल – सार्वजनिक बांधकाम विभाग देणार का लक्ष?
आबिद शेख/अमळनेर

अमळनेर : अमळनेर तालुक्यातील मांडळ ते वावडे या रस्त्याची अवस्था अतिशय दयनीय झाली असून, रोज ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांनी भरलेल्या या रस्त्यावरून प्रवास करणे म्हणजे जीव मुठीत धरून करावा लागणारा प्रवास झाला आहे.

रस्त्यावर सर्वत्र मोठे खड्डे पडल्याने दोनचाकी व चारचाकी वाहनधारकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यात तर या रस्त्याची परिस्थिती अधिकच बिकट होते. पाणी साचल्याने खड्डे नेमके कुठे आहेत हे लक्षात न आल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
स्थानिक नागरिकांनी अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला, मात्र अद्यापही कोणतीही ठोस दखल घेतली गेलेली नाही. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना आणि रुग्णवाहिका वाहतुकीलाही याचा मोठा फटका बसत आहे.
सार्वजनिक बांधकाम विभाग अखेर या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने रस्त्याची दुरुस्ती करणार का? असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 98700/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90800/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 75000/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 1155/-
भाव प्रती 10 ग्राम
22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट
