पातोंडा येथे अनधिकृत वाळू वाहतूक रोखली; वाहन तहसील कार्यालयात जप्त..

0
New-Doc-07-19-2025-10.38.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर तालुक्यातील पातोंडा परिसरात अनधिकृत वाळू वाहतूक करणारे एक ढपर (वाहन) महसूल विभागाच्या पथकाने आज जप्त केले असून पुढील कारवाईसाठी ते तहसील कार्यालयात लावण्यात आले आहे.

ही कारवाई तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पथकात श्री पवन शिंगारे (ग्राम महसूल अधिकारी, सावखेडा), श्री अनिल पवार (ग्राम महसूल अधिकारी, मठगव्हाण), श्री भरत निकम (पोलीस पाटील, मुंगसे), श्री राहुल पवार (पोलीस पाटील, खौशी), श्री महेश पाटील (पोलीस पाटील, धावडे), श्री रोहित भैसाणे (महसूल सेवक, पातोंडा) व श्री प्रदीप पाटील (महसूल सेवक, खौशी) यांचा समावेश होता.

महसूल विभागाच्या माहितीनुसार, या कारवाईनंतर वाहनचालकावर योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.

रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 98500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 90600/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74800/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1150/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed