अमळनेर पाचपावली चौक ते वडचौक रस्ता खड्ड्यांनी भरलेला – नागरिक त्रस्त, प्रशासन गप्प!

0
New-Doc-07-04-2025-22.57.jpg

आबिद शेख/अमळनेर


अमळनेर – शहरातील पाचपावली चौक ते वडचौक दरम्यानचा मुख्य रस्ता सध्या पूर्णपणे खड्ड्यांनी भरलेला असून या रस्त्यावरून चालणे देखील कठीण झाले आहे. या मार्गाचा वापर इस्लामपूरा, रामेश्वर नगर, आमलेश्वर नगर, शाह आलम नगर यासारख्या अनेक वस्तीतील नागरिक करतात.

या रस्त्यावरून दररोज लहान मुलांना शाळेत, महिलांना बाजारात आणि नागरिकांना कामावर जाण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खड्ड्यांमुळे अपघाताची शक्यता वाढली असून दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

शहराच्या विकासासाठी निधी असूनही रस्त्यांची दुरवस्था ही प्रशासनाच्या दुर्लक्षाचे स्पष्ट लक्षण आहे, अशी तीव्र नाराजी स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. अनेक वेळा तक्रारी करूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे संतप्त जनतेत नाराजीचा सूर आहे.

प्रशासनाने तत्काळ या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष द्यावे, अशी मागणी आता जोर धरत आहे.


रवि ज्वेलर्स
अमळनेर.

24 Ct सोने 99.50% : ₹. 97500/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 89700/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 74000/-.

शुद्ध चांदी 999% : ₹. 1090/-

भाव प्रती 10 ग्राम

22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरीत 50% सूट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed