घरकुल मंजुरीसाठी लाच घेताना ग्रामसेवक रंगेहात अटक. – एसीबीची यशस्वी सापळा कारवाई!
24 प्राईम न्यूज 24 Jun 2025

जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील मांडकी गावात घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाच मागणाऱ्या ग्रामसेवक व रोजगार सेवकाला अँन्टी करप्शन ब्युरोच्या पथकाने रंगेहात अटक केली आहे तक्रारदार ३५ वर्षीय पुरुष, रा. मांडकी, ता. भडगाव आरोपी सोनिराम धनराज शिरसाठ (वय 47) – ग्रामसेवक, रा. मांडकी व अंतुरली बुद्रुक
जितेंद्र लक्ष्मण चौधरी (वय 38) – रोजगार सेवक, रा. मांडकी
लाचेची मागणी:
दि. २३ जून २०२५ रोजी तक्रारदाराकडून घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी व नमुना ८ मिळवण्यासाठी ६ हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती रंगेहात अटक:
त्याच दिवशी सापळा रचण्यात आला असता आरोपींनी पंचासमक्ष ५ हजार रुपये लाच स्वीकारली, त्यांना त्वरित अटक करण्यात आली.
गुन्हा दाखल प्रक्रिया:
पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सापळा कारवाईतील अधिकारी:
श्री. योगेश ठाकूर, पोलिस उप अधीक्षक, ला.प्र.वि., जळगाव
सापळा व तपास अधिकारी: पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दिनेश सिंग पाटील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास पाटील पोलीस नाईक हेमंत पाटील
पोलीस नाईक सुभाष पावरा
मा. श्रीमती शर्मिष्ठा घारगे-वालावलकर मॅडम, पोलिस अधीक्षक, ला.प्र.वि., नाशिक परिक्षेत्र
कोणत्याही शासकीय कामासाठी कोणी लाच मागत असल्यास त्वरित अँन्टी करप्शन ब्युरोशी संपर्क साधावा.
📞 दुरध्वनी: 0257-2235477
📱 मोबाईल: 9702433131
📞 टोल फ्री: 1064
