अमळनेर-गलवाडे मार्गावरील धोकादायक खड्ड्याची त्वरित दुरुस्ती करा. – काँग्रेस कमिटीची सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मागणी.

0
New-Doc-05-18-2025-12.40.jpg

आबिद शेख/ अमळनेर



अमळनेर तालुका काँग्रेस कमिटीने अमळनेरहून गलवाडेकडे जाणाऱ्या राज्य मार्ग ६ वरील मुंदडा नगर २ च्या पुढे, श्री. केले सरांच्या घराजवळ पडलेल्या मोठ्या खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.

काँग्रेसचे तालुकाध्यक्ष भागवत सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या रस्त्याचा वापर गलवाडे, झाडी, भरवस, लोन-पंचम, एकलहरे, शहापूर आदी गावांतील नागरिक तसेच एसटी बसेससाठी होतो. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वळणावर मोठा खड्डा पडला असून, अवकाळी पावसामुळे त्याचा आकार वाढत चालला आहे. खड्ड्यात पाणी साचल्याने वाहनचालकांना धोका वाढला असून, अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

सदर रस्ता ठेकेदाराकडून देखभाल करण्याच्या करारात असूनही, अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे खड्ड्याची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांचा जीवितधोका टाळावा, अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

या निवेदनावर मनोज भाऊराव पाटील (शहराध्यक्ष, अमळनेर शहर काँग्रेस कमिटी), श्री. काशिनाथ पारील, संदीप घोरपडे, बन्सीलाल भागवत,शरद पितांबर पाटील, प्रताप नागराज पाटील, तूषार संदांशिव, राजेंद्र साळुंखे,दिलीप साहेबराव पाटील,विलास सिताराम पाटील आदींच्या सह्या आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed