लग्नाच्या तीन दिवस आधी तरुणीची आत्महत्या; तांबेपूर परिसरात खळबळ..

0
New-Doc-05-16-2025-06.14.jpg


आबिद शेख/ अमळनेर

रवि ज्वेलर्स
अमळनेर.
24 Ct सोने 99.50% : ₹. 94400/-.
22 Ct सोने 91.60% : ₹. 86850/-.
18 Ct सोने 75.00% : ₹. 71750/-.
शुद्ध चांदी 999% : ₹. 975/-
भाव प्रती 10 ग्राम
*22 कैरेट 916 हॉलमार्क दागिने मजूरी फ़क्त @ 5% **

अमळनेर तांबेपूर परिसरात (१५ मे) पहाटेच्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणीने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे १७ मे रोजी तिचा विवाह गडखाब येथील तरुणासोबत होणार होता. कालच तिच्या घरी मेहंदीचा कार्यक्रम पार पडला होता, तर आज हळदीचा कार्यक्रम होणार होता.

सर्वांच्या पसंतीचे एकमेव शोरुम

मात्र, आज पहाटे तिच्या आईने तिचा शोध घेतला असता, ती घरातील बाजूच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली. ही घटना समजताच घरात एकच खळबळ उडाली आणि संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. विवाहाच्या तयारीने आनंदी असलेले घर एका क्षणात शोकमय वातावरणात बदलले.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी सुभाष पाटील यांच्या दुसऱ्या पत्नीची मुलगी होती. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून प्राथमिक तपास सुरू केला आहे. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed