राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा – अमळनेर येथे विविध उपक्रमांचे आयोजन

0
New-Doc-01-26-2025-07.24.jpg

आबिद शेख/अमळनेर

अमळनेर: आज राष्ट्रीय मतदार दिवस निमित्त उपविभागीय अधिकारी व तहसीलदार कार्यालय, अमळनेर येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश मतदारांमध्ये जनजागृती करणे व त्यांचे अधिकार समजावून सांगणे हा होता.

कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, पोस्टर/चित्रकला स्पर्धा, पथनाट्य सादरीकरण, तसेच श्रमदान मोहीम यांसारखे विविध उपक्रम उत्साहात पार पडले. श्रम साफल्य एज्युकेशन सोसायटीच्या पंडित जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय, रूक्मिणी ताई महिला महाविद्यालय, प्रताप महाविद्यालय (अमळनेर), तसेच एन. एम. पाटील महाविद्यालय (मारवड) येथील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.

समाजकार्य महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांनी परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी स्वयंसेवक सागर कोळी आणि त्यांच्या टीमने प्रभावी पथनाट्य सादर केले. रूक्मिणी ताई महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनीही पथनाट्य सादरीकरणाद्वारे मतदार जनजागृतीचा संदेश दिला.

कार्यक्रमाला प्रांत अधिकारी नितीनकुमार मुंडावरे, तहसिलदार रुपेशकुमार सुराणा, नायब तहसीलदार प्रशांत धमके, नितीन ढोकणे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अधिकारी वर्गाने सहभागी विद्यार्थी व प्राध्यापकांचे कौतुक केले.

कार्यक्रमादरम्यान घेतलेल्या विविध स्पर्धांमध्ये प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

राष्ट्रीय मतदार दिवसाच्या माध्यमातून जनजागृतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed