एनईएफटी करताना समोरील खातेदाराची पडताळणी होणाररिझर्व्ह बँकेचे ‘एनपीसीआय’ला आदेश..

0
New-Doc-12-31-2024-07.54.jpg

24 प्राईम न्यूज 31 Dec 2024

अनेकदा बँक ग्राहक आरटीजीएस व एनईएफटीद्वारे पैसे पाठवताना चुकीच्या खात्यात पैसे पाठवतात. आता रिझर्व्ह बँकेच्या नवीन आदेशानुसार, आरटीजीएस व एनईएफटी करण्यापूर्वी ज्या व्यक्तीला पैसे पाठवणार आहोत, त्याचे नाव व त्याच्या खात्याची पडताळणी करू शकतील. आता आरबीआयनेत्यासाठी नवीन यंत्रणा तयार करण्याचे आदेश ‘एनपीसीआय’ला दिले आहेत.

सध्या यूपीआय, आयएमपीएसद्वारे पैसे हस्तांतरित करताना समोरील खातेदाराच्या खात्याची पडताळणी केली जाते. ही सुविधा सध्या एनईएफटी व आरटीजीएसला उपलब्ध नव्हती. आता या नवीन निर्णयामुळे आर्थिक फसवणुकीला लगाम घालता येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed