अमळनेर तहसील कार्यालयात ५ ऑक्टोबरला महसूल लोक अदालत प्रलंबित महसुली दावे व अपिले तडजोडीने निकाली काढण्याची संधी; पक्षकारांनी अर्ज सादर करण्याचे तहसीलदार डॉ. उमी ढेकळे यांचे आवाहन.

0

अमळनेर /आबिद शेख 

 

 

 

अमळनेर : महसूल प्रशासनातील प्रलंबित प्रकरणांचा तडजोडीने व परस्पर संमतीने कायमस्वरूपी निपटारा करण्यासाठी “महात्मा ज्योतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान” राबविण्यात येत आहे. अमळनेर तालुक्यातील महसुली अर्धन्यायिक प्रकरणांसाठी ५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, अमळनेर येथे या अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.

शासन निर्णयानुसार राज्यभर राबविण्यात येणाऱ्या या अभियानात मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार आणि तहसीलदार यांच्या अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये प्रलंबित असलेल्या विविध प्रकारच्या महसुली दावे व अपिलांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही पक्षकारांच्या परस्पर संमतीने व तडजोडीने प्रकरणांचा अंतिम निपटारा करून पक्षकारांना जलद न्याय मिळवून देणे, तसेच महसूल प्रशासनावरील प्रलंबित प्रकरणांचा ताण कमी करणे हा अभियानाचा प्रमुख उद्देश आहे.

 

 

प्रलंबित महसुली दावा किंवा अपील असलेल्या पक्षकारांनी अथवा त्यांच्या वकिलांनी शासन निर्णयासोबतच्या ‘प्रपत्र-अ’ मधील नमुन्यानुसार तडजोडीसाठी अर्ज संबंधित अर्धन्यायिक न्यायालयात सादर करावा. लोक अदालतच्या निश्चित दिवशी दोन्ही पक्षांच्या सहमतीने प्रकरणावर अंतिम आदेश पारित करून ते कायमस्वरूपी निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

अमळनेर तालुक्यातील मंडळ अधिकारी, नायब तहसीलदार व तहसीलदार यांच्या स्तरावर अर्धन्यायिक प्रकरणे सुरू

असलेल्या सर्व पक्षकारांनी या अभियानात सहभागी होऊन तडजोडीसाठी अर्ज सादर करावा आणि आपले प्रलंबित प्रकरण निकाली काढण्यासाठी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. उमी ढेकळे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed