अमळनेरात २० डिसेंबरला ऑल मुस्लिम समाजाचा सामूहिक विवाह सोहळा हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचा उपक्रम; ११ जोडप्यांचे निकाह, नावनोंदणीसाठी १० नोव्हेंबरपर्यंत मुदत.

0

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर : शहरातील हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ऑल मुस्लिम समाजातील गरजू वधू-वरांसाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा रविवार, दि. २० डिसेंबर २०२६ रोजी इंदिरा गांधी भवन, अमळनेर येथे उत्साहात पार पडणार असून, यामध्ये ११ जोडप्यांचे सामूहिक निकाह आयोजित करण्यात आले आहेत.

Oplus_131072

संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येणाऱ्या या उपक्रमाचा उद्देश आर्थिकदृष्ट्या गरजू कुटुंबांना विवाहासाठी मदतीचा हात देणे हा आहे. विवाहावरील अनावश्यक खर्चाला आळा घालून गरजू युवक-युवतींना सन्मानाने नवीन संसाराची सुरुवात करता यावी, यासाठी संस्था सातत्याने कार्यरत आहे.


या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक जोडप्यास संस्थेच्या वतीने पलंग सेट, कपाट तसेच विविध संसारोपयोगी वस्तू देण्यात येणार आहेत. तसेच वधू आणि वर पक्षाच्या कुटुंबातील प्रत्येकी १०० व्यक्तींच्या भोजनाची व्यवस्था संस्थेमार्फत करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
या सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या मुला-मुलींची नावनोंदणी करू इच्छिणाऱ्या पालकांनी दि. १० नोव्हेंबर २०२६ पर्यंत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
संपर्क : ७५०७१५७७८६ / ९०४९९४९९४१
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी हसनैन करीमैन वेल्फेअर संस्थेचे अध्यक्ष हाजी मोना शेख, उपाध्यक्ष सैय्यद नबी व जुबेर पठाण, सचिव सैय्यद अजहर अली, सहसचिव अशफाक शेख, खजिनदार आरिफ मेमन तसेच सदस्य जाकिर शेख, हाजी मट्या खाटीक व इम्रान शेख परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed