मंगरूळ येथे जुनी पेन्शन योजनेसाठी शिक्षकांचे काळ्या फिती लावून आंदोलन १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त व नंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : तालुक्यातील मंगरूळ येथील स्व. आबासो अनिल अंबर पाटील माध्यमिक व डॉ. अस्मिता प्रतापराव दिघावकर उच्च माध्यमिक विद्यालयात जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून आंदोलनास सुरुवात केली.
दि. १ ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी काळ्या फिती लावून नियमित कामकाज करणार आहेत. दि. १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त झालेल्या व त्यानंतर १०० टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, अशी या आंदोलनाची प्रमुख मागणी आहे.

आंदोलनाच्या पहिल्या दिवशी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. प्रकाश पाटील, श्री. अशोक सूर्यवंशी, श्री. प्रभुदास पाटील (अध्यक्ष, जुनी पेन्शन संघटना, अमळनेर), श्री. संजय पाटील, श्री. राजेंद्र पाटील, सौ. सुषमा सोनवणे, सौ. शितल चव्हाण, सौ. सिमा मोरे, सौ. श्रुती पाटील, सौ. सिमा पाटील उपस्थित होते.

तसेच वस्ती शाळेचे मुख्याध्यापक श्री. भटू पाटील, श्री. प्रविण पाटील, श्री. मनोज पाटील, श्री. सुदर्शन पवार, श्री. प्रदीप पाटील, श्री. खुशाल पाटील यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत असून, संबंधित कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देऊन योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

