महिला सन्मान व रक्षाबंधनाचा संदेश देत रवि ज्वेलर्सचा विशेष कार्यक्रम उत्साहात.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर : रवि ज्वेलर्सतर्फे महिला सन्मान, महिला समानता आणि रक्षाबंधनाच्या पवित्र नात्याचे महत्त्व अधोरेखित करणारा विशेष कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमास तनिष्का ग्रुपच्या महिला सदस्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवर व महिलांचे स्वागत करण्यात आले. महिला सन्मान व समानता या विषयावर रवि वर्मा आणि अॅड. तिलोत्तमा पाटील यांनी मार्गदर्शन केले. महिलांना समान संधी, सन्मान तसेच निर्णयप्रक्रियेत सहभाग मिळण्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले.
रक्षाबंधनाचे महत्त्व तसेच भाऊ-बहीणीच्या प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते याबाबत सौ. उषा देवरे मॅडम यांनी मार्गदर्शन केले. रवि ज्वेलर्सच्या विविध योजना व वैशिष्ट्यांची माहिती निखिल वर्मा यांनी दिली.


कार्यक्रमात विविध मनोरंजक गेम्स, प्रश्नोत्तरे आणि संवादात्मक उपक्रम घेण्यात आले. त्यामुळे कार्यक्रमाला आनंदी, उत्साही आणि आपुलकीचे वातावरण लाभले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अॅड. तिलोत्तमा पाटील होत्या. यावेळी उषा देवरे मॅडम, हेमा भामरे, करुणा सोनार, कल्पना पाटील, डॉ. विनीता चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते. रवि ज्वेलर्सतर्फे रवि वर्मा, निखिल वर्मा, मातोश्री सौ. सुलोचना वर्मा, सौ. गुंजन वर्मा, आराध्या वर्मा आदी उपस्थित होते.
कार्यक्रमास उपस्थित सर्व महिलांना रवि ज्वेलर्सतर्फे प्रेमपूर्वक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या माध्यमातून महिलांप्रती आदर, कृतज्ञता आणि आपुलकीची भावना व्यक्त करण्यात आली.

Oplus_131072

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed