अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाजाचा गुणगौरव सोहळा उत्साहात; ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर वैश्यवाणी (शेटे) समाज मंडळाच्या वतीने इंदिरा भवन येथे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.


कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी खान्देशातील ९० हून अधिक गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र आणि शैक्षणिक साहित्य देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत मान्यवरांनी सातत्यपूर्ण परिश्रम, शिस्त, ध्येयनिश्चिती आणि कौशल्याधारित शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले.
सोहळ्यात शिवाजी रामदास भदाणे (अमळनेर), चोपडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजीव शेटे, नाशिक येथील गजानन दलाल, सेवानिवृत्त सैनिक शिवदास शेटे तसेच प्रगतशील शेतकरी राजेश शेटे यांनी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा योग्य वापर, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक मूल्ये जपण्याचा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश शेटे आणि जान्हवी सोनवणे यांनी केले. अध्यक्ष किरण तायडे आणि कार्याध्यक्ष संजय शेटे यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमानंतर शेटे बंधू केटर्सचे संचालक राजेंद्र शेटे, सुनील शेटे आणि किरण शेटे यांच्या वतीने उपस्थितांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अध्यक्ष किरण तायडे, उपाध्यक्ष योगेश शेटे, कार्याध्यक्ष संजय शेटे, सचिव पंकज शेटे, खजिनदार गिरीश शेटे, संघटक राकेश शेटे, सल्लागार शिवाजी भदाणे, बळीराम वाणी, शिवदास शेटे, राजेंद्र देसले, माजी अध्यक्ष पुरुषोत्तम शेटे तसेच अविनाश शेटे, धिरज शेटे, शुभम शेटे, निखिल शेटे, मयुर शेटे, साहिल शेटे, दर्शन शेटे आणि समाज मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed