वरिष्ठांच्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका!उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नागरिकांना आर्जव..
24 प्राईम न्यूज 5 फेब्रु 2024. मी आजपर्यंत तुमच्याकडे काहीही मागितले नाही. मी खासदारकीला उभ्या करणाऱ्या उमेदवारासाठी मते मागणार आहे. तुम्ही ‘वरिष्ठां’च्या भावनिक आवाहनाला बळी पडू नका, असे शरद पवारांचे नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला आर्जव केले.
अजित पवार यांनी त्यांचाच बालेकिल्ला असलेल्या बारामतीत हा टोला लगावला. बारामतीत पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन केल्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना अजित पवार म्हणाले की, शेवटची निवडणूक आहे, असे सांगून तुम्हाला भावनिक आवाहन केले जाईल. पण, कधी शेवटचीअसणार आहे काय माहीत ? असे सांगून त्यांनी शरद पवारांना ली टोला लगावला. इतकी वर्षे वरिष्ठांचे ऐकले, आता माझे क ऐका. एकीकडे अजित सांगतो आहे आणि एकीकडे वरिष्ठ 3 सांगताहेत. तुमच्यासमोर प्रश्न पडला असेल की, कुणाचे ऐकायचे. उद्या आपल्या विचाराचा खासदार दिला तर मी मोदींना सांगेन की माझ्या लोकांनी खासदार दिला आहे. आता माझी कामे झाली पाहिजेत. आपल्या अडचणीला कोण उपयोगी पडतो याचा विचार करा, असे भावनिक आवाहन अजित पवार यांनी केले.
