मांडळ येथे अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले ; महसूल विभागाची कारवाई.
अमळनेर/ आबिद शेख

अमळनेर – मौजे मांडळ, ता. अमळनेर येथे आज अवैधरित्या गौण खनिज (रेती) वाहतूक करणारे ट्रॅक्टर महसूल विभागाने पकडले आहे.
उपविभागीय अधिकारी, अमळनेर भाग व तहसीलदार, अमळनेर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, मौजे मांडळ परिसरात बेकायदेशीररित्या रेती वाहतूक होत असल्याची माहिती महसूल विभागास मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक MH-17 … ताब्यात घेण्यात आले.

सदर ट्रॅक्टर ट्रॉलीसह जप्त करून तहसील कार्यालय, अमळनेर येथे जमा करण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.
सदर कारवाईत मंडळ अधिकारी बाबरे, ग्राम महसूल अधिकारी संदीप माळी, ग्राम महसूल अधिकारी पी. आर. पाटील, ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील, तलाठी जावखेडा, तलाठी बावणे यांच्यासह महसूल पथकाने सहभाग घेतला.

