डी. आर. कन्या शाळेची कबड्डीमध्ये जिल्हास्तरावर झेप ; 14 व 17 वयोगटात दुहेरी विजेतेपद.
अमळनेर /आबिद शेख

अमळनेर येथील नामवंत खानदेश शिक्षण मंडळ संचलित श्रीमती द्रौपदी रतनचंद कन्या शाळेने क्रीडा क्षेत्रात घवघवीत यश संपादन केले आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय शालेय कबड्डी स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत कन्या शाळेच्या मुलींनी 14 वर्षे व 17 वर्षे अशा दोन्ही वयोगटात अंतिम सामना जिंकून दुहेरी विजेतेपद पटकाविले आहे.

14 वर्षे वयोगटात ललिता पाटील स्कूलचा तर 17 वर्षे वयोगटात आश्रम शाळा, रणाईचे संघाचा पराभव करून कन्या शाळेने हा दुहेरी मुकुट मिळविला. या विजयामुळे दोन्ही संघांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली असून पुढील स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे होणार आहे.
14 वर्षे वयोगट -* कर्णधार जिंकरा शेख शाकिर, भैरवी पाटील, कृतिका वाडेकर, आराध्या पाटील, श्रावणी साळुंखे, लावण्या पाटील, दिव्या पाटील, कावेरी अहिरे, हिमानी पाटील, रिदा फातेमा सादिक.
*17 वर्षे वयोगट -* कर्णधार अश्मिरा शाकिर शेख, कावेरी पाटील, पुनवी निकम, कल्याणी पारधी, केतकी देशपांडे, इशा पाटील, मयुरी पवार, लिना गुरव, कामिनी सोनवणे, वैष्णवी पाटील, समिक्षा जाधव, रिशिका गोयल, स्नेहल पाटील, मोनिका भोई.
या यशाबद्दल अमळनेरच्या तहसीलदार डॉ. उमा ढेकळे मॅडम यांनी दोन्ही संघांचा चषक व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन भाऊसो जितेंद्र जैन, मुख्याध्यापिका सौ. एस. एस. सूर्यवंशी, उपमुख्याध्यापक श्री. एस. आर. शिंगाणे, पर्यवेक्षक श्री. एस. पी. वाघ, शिक्षक प्रतिनिधी सौ. पी. पी. जोशी, कार्यालय प्रमुख श्री. शाम पवार यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले.
या दोन्ही संघांना क्रीडा विभाग प्रमुख श्रीमती आर. एस. सोनवणे, श्री. एस. एस. माळी, श्रीमती आर. एस. सोनवणे व श्री. किरण सनेर यांनी मार्गदर्शन केले व परिश्रम घेतले.

