अमळनेर आगारातून लातूर आणि बारामतीसाठी विशेष एसटी बससेवा सुरू; दिवाळीत प्रवाशांना दिलासा लातूरसाठी सकाळी ८.१५, तर बारामतीसाठी सकाळी ६.३० वाजता बस सुटणार; विशेष दिवाळी वाहतुकीसाठी एसटी महामंडळाचा पुढाकार.

0

 

अमळनेर | आबिद शेख

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागांतर्गत अमळनेर आगारातर्फे लातूर आणि बारामती या दोन मार्गांवर विशेष एसटी बससेवा सुरू करण्यात येत आहे. या सुविधेमुळे अमळनेर तालुक्यातील प्रवाशांना दिवाळीच्या काळात प्रवास करणे अधिक सोयीचे होणार आहे.

लातूरसाठी सकाळी ८.१५ वाजता बस

अमळनेर ते लातूर या मार्गावर सकाळी ८.१५ वाजता बस सुटणार आहे. या बसचे पूर्ण तिकीट ९७० रुपये, तर अर्धे तिकीट ४८५ रुपये आहे. या बसचा मार्ग अमळनेर – जळगाव – सिल्लोड – जालना – बीड – अंबाजोगाई – बारामती मार्गे लातूर असा दर्शविण्यात आला आहे.

बारामतीसाठी सकाळी ६.३० वाजता बस

अमळनेर ते बारामती या मार्गावर सकाळी ६.३० वाजता बस सुटणार आहे. या बसचे पूर्ण तिकीट ८०० रुपये, तर अर्धे तिकीट ४१० रुपये आहे. या बसचा मार्ग अमळनेर – पारोळा – चाळीसगाव – छत्रपती संभाजीनगर – अहिल्यानगर – दौंड – बारामती असा आहे.

एनसीएमसी कार्डधारकांना सवलतीचा लाभ

या दोन्ही बससेवांमध्ये एनसीएमसी कार्डवरील सर्व लागू सवलतींचा लाभ घेता येणार असल्याची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. दिवाळीच्या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी आणि प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अमळनेर आगाराने हा पुढाकार घेतला आहे.

प्रवाशांनी अधिक माहितीसाठी अमळनेर आगार व्यवस्थापक राकेश शिवदे (८२०८०१४६९१), स. का. अ. प्रमोद बाविस्कर (९५११७६११५८), वाहतूक निरीक्षक मुकेश सेंदाणे (९२७०८३९९९०) आणि स. वा. नि. सतीश सातपुते (९४२३९३५११८) यांच्याशी संपर्क साधावा.

दिवाळीच्या सणात प्रवाशांनी या विशेष एसटी बससेवेचा लाभ घेऊन सुरक्षित आणि सुखकर प्रवास करावा, असे आवाहन अमळनेर आगारातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed