आण्णा मिस्तरी यांचे दुःखद निधन; ठाकरे कुटुंबावर शोककळा.
अमळनेर | आबिद शेख 
अमळनेर शहरातील इस्लामपुरा भागातील साईबाबा मंदिराजवळील रहिवासी प्रकाश बाबुराव ठाकरे (आण्णा मिस्तरी) वय ७१ यांचे दि. १९ रोजी रात्री १.३० वाजता दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रकाश बाबुराव ठाकरे हे नगरपालिकेच्या हायस्कूलमधील अकाउंटंट बबन ठाकरे यांचे मोठे बंधू होते. तसेच इंदूर येथील बांधकाम व्यावसायिक रवींद्र ठाकरे आणि अमळनेर पंचायत समितीतील घनश्याम ठाकरे यांचे ते वडील होते.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, पत्नी, दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने ठाकरे कुटुंबीयांसह नातेवाईक व परिचितांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.
