अमळनेरच्या ताडेपुरा भागात दोन टपऱ्यांना आग; अग्निशमन दलाने तात्काळ धाव घेत आगीवर मिळवले नियंत्रण.

0

अमळनेर/आबिद शेख 

अमळनेर : शहरातील ताडेपुरा भागातील अहिल्या माता मंदिराच्या मागे गुरुवारी रात्री १२:३० वाजेच्या सुमारास दोन टपऱ्यांना आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून आग विझवली.

मिळालेल्या माहितीनुसार, ताडेपुरा भागातील अहिल्या माता मंदिराच्या मागे बापू जगन्नाथ धनगर आणि मंगलाबाई बारकू पवार यांच्या टपऱ्यांना आग लागली. याबाबत महेंद्र बिर्‍हाडे यांनी दूरध्वनीवरून अग्निशमन दलाला माहिती दिली. माहिती मिळताच अग्निशमन वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करत संपूर्ण आग विझवली.

या अग्निशमन मोहिमेत कर्मचारी फारूक शेख, भीकन पठाण, आनंदा झिंबल आणि दिनेश बिर्‍हाडे यांनी सहभाग घेतला.

आगीचे नेमके कारण आणि टपऱ्यांचे किती नुकसान झाले, याबाबतची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed