गांधलीपुरा परिसरात चाकू आणि लोखंडी रॉडने दोघांवर हल्ला; दोघे जखमी बोरी नदीच्या पात्रातील घटना; दोघांविरुद्ध अमळनेर पोलिसांत गुन्हा दाखल.

0

 

अमळनेर | आबिद शेख

अमळनेर शहरातील गांधलीपुरा परिसरात किरकोळ कारण नसताना दोघांना चाकू आणि लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. रात्री पावणे बाराच्या सुमारास आंबेडकर भवनाजवळील बोरी नदीच्या पात्रात हा प्रकार घडला. याप्रकरणी अमळनेर पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अल्तमश शेख साहिद आणि आकीब शेख आबिद, रा. चूनाघाणी, गांधलीपुरा हे आंबेडकर चौकातून घरी जात असताना शरद ऊर्फ दादू आसू पारधी, रा. पारधीवाडा, गांधलीपुरा आणि मोन्या (पूर्ण नाव माहीत नाही), रा. मेहतर कॉलनी यांनी त्यांना बोरी नदीच्या पात्रात बोलावून घेतले.

यावेळी शरद ऊर्फ दादू याने हातातील चाकूने अल्तमश याच्या पाठीवर वार केला, तर मोन्या याने लोखंडी रॉडने आकीब याच्या डाव्या पायाच्या पोटरीवर प्रहार केला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघेही जखमी झाले. त्यानंतर त्यांनी तेथून पळ काढला.

या घटनेनंतर जखमींनी अमळनेर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दिली. त्यानुसार शरद ऊर्फ दादू आणि मोन्या यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हेडकॉन्स्टेबल विनोद भोई करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed