एनएसयूआय आक्रमक; निवडणूक आयुक्तांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन दसऱ्याच्या मुहूर्तावर काँग्रेस कार्यकर्त्यांचे आंदोलन; मतदारांच्या हक्कांचे संरक्षण आणि निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकतेची मागणी.

0

अमळनेर | आबिद शेख
निवडणूक प्रक्रियेतील कथित मतचोरी आणि गैरप्रकारांच्या आरोपांवरून अमळनेरमध्ये नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या वतीने आंदोलन करण्यात आले. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करून आंदोलकांनी तीव्र निषेध व्यक्त केला. निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता कायम ठेवावी आणि निवडणूक आयोगाने निष्पक्षपणे काम करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


दसरा हा सत्याचा असत्यावर आणि न्यायाचा अन्यायावर विजय दर्शविणारा सण मानला जातो. याच पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी प्रतीकात्मक पुतळादहन केले. लोकशाही व्यवस्थेत मतदानाचा अधिकार हा नागरिकांचा मूलभूत आधार असून, प्रत्येक मताचे महत्त्व जपणे ही निवडणूक आयोगाची महत्त्वाची जबाबदारी असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed