अमळनेरच्या पवन पाटील यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल; नाशिक येथे मान्यवरांच्या हस्ते सन्मान.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर येथील साने गुरुजी विद्या मंदिर शाळेचे उपक्रमशील उपशिक्षक पवन नामदेव पाटील यांना अ‍स्पायर फाउंडेशनतर्फे प्रदान करण्यात येणाऱ्या ‘राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. रविवार, १८ ऑक्टोबर रोजी नाशिक येथील संजीवनी ए. सी. बँक्वेट हॉल अँड लॉन्स, नांदूर नाका येथे आयोजित भव्य पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.


उल्लेखनीय कार्याची पुरस्कारासाठी निवड
पवन पाटील यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत अ‍स्पायर फाउंडेशनने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली. फाउंडेशनतर्फे ऑनलाइन पद्धतीने मागविण्यात आलेल्या नामनिर्देशन प्रस्तावांची छाननी केल्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राज्यस्तरीय सन्मानासाठी पात्र ठरविण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed