पारोळा रस्त्यावरील साई गजानन भागात महिनाभरापासून पाणीगळती; हजारो लिटर पाण्याचा अपव्यय पाणीपुरवठा सुरू झाला की गळतीला सुरुवात; अधिकाऱ्यांच्या पाहणीनंतरही दुरुस्ती नाही, नागरिकांची कायमस्वरूपी उपाययोजनेची मागणी.

0

प्रतिनिधी | अमळनेर
अमळनेर शहरातील पारोळा रस्त्यालगत असलेल्या साई गजानन भागातील खालच्या परिसरात गेल्या महिनाभरापासून पाणीगळतीची समस्या कायम आहे. नळाला पाणी येताच पाइपलाइनमधून गळती सुरू होत असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे. विशेष म्हणजे, नागरिकांनी तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली; मात्र अद्याप दुरुस्ती करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.
पाणी आले की गळती, पुरवठा बंद झाला की थांबते!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed