Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर : अमळनेर पोलीस ठाण्यातील आढावा भेटीदरम्यान तत्कालीन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक, चाळीसगाव अशोक नखाते यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी जळगाव जिल्ह्याचे प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्यासह विविध प्रशासकीय व विभागीय विषयांवर चर्चा करण्यात आली.

या भेटीदरम्यान अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांचा प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रशासकीय अधिकारी सुरेश जाधव यांचा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक कोते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


यावेळी अमळनेरचे पोलीस निरीक्षक दत्तात्रेय निकम, होमगार्डचे अमळनेर तालुका समादेशक गोपाल वना पाटील, कंपनी नायक अरुण नेरकर, वरिष्ठ पलटण नायक रविंद्र ठाकूर तसेच जळगाव पीटीसी येथील कैलास पाटील, कमलेश वानखेडे यांच्यासह पोलीस व होमगार्ड विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सदिच्छा भेटीदरम्यान पोलीस प्रशासन आणि होमगार्ड विभागातील कामकाज, परस्पर समन्वय आणि प्रशासकीय बाबींवर चर्चा झाली. या भेटीमुळे दोन्ही विभागांमधील समन्वय अधिक बळकट होण्यास मदत होणार असल्याचे उपस्थितांनी सांगितले.

You may have missed