Main Story

Editor's Picks

Blog

अमळनेर /आबिद शेख
अमळनेर : अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघाच्या आयोजनाने, अखिल भारतीय तेरापंथ युवक परिषद प्रस्तुत तसेच आचार्य श्री महाश्रमणजी यांच्या प्रेरणेने आज, १७ सप्टेंबर २०२६ रोजी अमळनेरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.


“रक्तदान… जीवनदान… आपका एक कदम, किसी के लिए नई उम्मीद…” तसेच “थेंब तुमचा, जीवन त्यांचे—रक्तदान ही सर्वोत्तम सेवा, मानवतेचा खरा उत्सव” या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी आवाहन करण्यात आले आहे.
हे रक्तदान शिबिर तेरापंथ भवन, न्यू प्लॉट, अमळनेर तसेच प्रताप कॉलेज व इच्छादेवी चौक, अमळनेर या दोन ठिकाणी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.


या शिबिराचे विशेष आकर्षण म्हणजे रक्तदान करणाऱ्या प्रत्येक रक्तदात्याला प्रोत्साहनपर भेट म्हणून आकर्षक ट्रॉली बॅग देण्यात येणार आहे. “रक्तदान करा… आयुष्य भेट घ्या… एक छोटी कृती, मोठा फरक!” या उद्देशाने सुरक्षित रक्तदान, निरोगी समाज आणि गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात येत आहे.
या सामाजिक उपक्रमात रोटरी क्लब अमळनेर, रोट्रॅक्ट क्लब अमळनेर, लायन्स क्लब अमळनेर, न्यू प्लॉट परिसर विकास मंच, जैन सोशल ग्रुप आणि जय बजरंग व्यायामशाळा अमळनेर यांचे सहकार्य लाभत आहे.
अधिकाधिक नागरिकांनी पुढाकार घेऊन रक्तदान करावे आणि मानवतेच्या या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघ, तेरापंथ युवक परिषद तसेच सर्व सहयोगी संस्थांतर्फे करण्यात आले आहे.

You may have missed