महिला व विद्यार्थ्यांसाठी DL Social Foundationतर्फे मोफत संगणक प्रशिक्षण डिजिटल कौशल्य विकासासाठी उपक्रम; पहिल्या बॅचमध्ये केवळ १० प्रशिक्षणार्थींना प्रवेश.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : डिजिटल युगात संगणकाचे ज्ञान ही काळाची गरज बनली आहे. महिला व विद्यार्थ्यांना संगणकाचे मूलभूत ज्ञान मिळावे तसेच त्यांच्यात डिजिटल कौशल्य विकसित व्हावे, या उद्देशाने DL Social Foundation, Amalner यांच्या वतीने मोफत संगणक प्रशिक्षण उपक्रम सुरू करण्यात येत आहे.
Community Development & Empowerment Project अंतर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, प्रशिक्षणाचा कालावधी एक महिन्याचा आहे. पहिल्या बॅचमध्ये केवळ १० प्रशिक्षणार्थींना प्रवेश दिला जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणाच्या माध्यमातून महिला व विद्यार्थ्यांना संगणकाच्या मूलभूत वापरासोबतच डिजिटल जगाशी आत्मविश्वासाने जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. “डिजिटल ज्ञान — स्वावलंबी जीवनाची पहिली पायरी” या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
मोफत संगणक प्रशिक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिला व विद्यार्थ्यांनी प्रवेश मर्यादित असल्याने DL Social Foundation कार्यालय, समर्थ नगर, धुळे रोड, अमळनेर येथे प्रत्यक्ष भेट देऊन नाव नोंदणी करावी.
अधिक माहितीसाठी 7796112894 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.

