साक्षरतेचा संदेश चित्रांतून; लोंढवे विद्यालयात चित्रकला स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद.

0

अमळनेर/आबिद शेख 


लोंढवे, ता. अमळनेर : स्व. आबासो एस. एस. पाटील माध्यमिक विद्यालय, लोंढवे येथे साक्षरता दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कला शिक्षक डी. आर. वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत आपल्या कलागुणांचे दर्शन घडविले.


साक्षरतेचे महत्त्व, शिक्षणाचा प्रसार, सामाजिक जागृती यांसह विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक चित्रे साकारली. रंगसंगती, रेखाटन आणि कल्पकतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी सामाजिक संदेश प्रभावीपणे मांडला.


स्पर्धेदरम्यान विद्यालयात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आपली सर्जनशीलता सादर केली. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आवश्यक मार्गदर्शन करून त्यांच्या कलाकृतींचे कौतुक केले.
मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच सामाजिक विषयांबाबत त्यांच्यात जागरूकता निर्माण होते, असे सांगितले.
या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed