जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने २५ आदर्श शिक्षकांचा सन्मान अमळनेरचे प्रा. हिरालाल पाटील यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरव.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : शिक्षक दिनाचे औचित्य साधून जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने काँग्रेस भवन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २५ आदर्श शिक्षकांचा सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

प्रा. हिरालाल पाटील यांचा विशेष गौरव

अमळनेर तालुक्यातील प्रा. हिरालाल पाटील यांनाही त्यांच्या उल्लेखनीय शैक्षणिक योगदानाबद्दल आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. प्रा. पाटील हे वसंतनगर, ता. पारोळा येथील जुनिअर कॉलेजमध्ये गेल्या १६ वर्षांपासून कार्यरत असून, त्यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या योगदानाची दखल घेत जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.
या सन्मानाबद्दल संस्थेचे अध्यक्ष सुभाष जाधव, प्राचार्य के. आर. पाटील, मुख्याध्यापक आर. सी. चौधरी, ज्येष्ठ शिक्षक एस. जे. भामरे, एम. डी. सूर्यवंशी, डी. एस. पाटील यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रा. हिरालाल पाटील यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

