अमळनेर शहरात जयनिल फाउंडेशन व अल-खिदमत ट्रस्टतर्फे वृक्षारोपण हजरत बाले मियाँ दरगाह, रॉयल उर्दू हायस्कूलसह मुस्लिम कब्रस्तानात वृक्षारोपण; गौतम अनिल पाटील यांचा सत्कार.
अमळनेर/ आबिद शेख 
अमळनेर, प्रतिनिधी : पर्यावरण संवर्धनासह अमळनेर शहर अधिकाधिक हरित करण्याच्या उद्देशाने जयनिल फाउंडेशन, अमळनेर व अल-खिदमत ट्रस्ट, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध ठिकाणी वृक्षारोपण मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाची सुरुवात हजरत बाले मियाँ दरगाह शरीफ येथे वृक्षारोपण करून करण्यात आली.
यानंतर रॉयल उर्दू हायस्कूलच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी शाळेच्या सर्व स्टाफच्या वतीने जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील यांचा मुख्याध्यापिकांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या उपक्रमास जयनिल फाउंडेशनचे अध्यक्ष गौतम अनिल पाटील, हाजी शब्बीर पहलवान, हाजी रफीक तेली साहेब, हाजी अखलाक सर, असलम पठाण, अल-खिदमत ट्रस्टचे अज़हर काज़ी, अयाज बागवान, समीर सय्यद, हुज़ैफा खान, सकलेन खान, तनवीर शाह, जैद शेख, दानिश खान यांच्यासह दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व संबंधित संस्थांचे सदस्य उपस्थित होते.

जयनिल फाउंडेशन व अल-खिदमत ट्रस्टच्या या संयुक्त सामाजिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमाचे अमळनेर शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.


