राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी भाऊराव चव्हाण.
अमळनेर/आबिद शेख

अमळनेर : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अमळनेर शहराध्यक्षपदी भाऊराव श्रीपत चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या संघटनात्मक व सामाजिक कार्यातील योगदानाची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पंडितजी कांबळे (मुंबई), सामाजिक न्याय विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष अरुण धर्माळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभाताई शिरसाठ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश बहारे, जळगाव जिल्हाध्यक्ष सुरेश पगारे तसेच जिल्हा सरचिटणीस चंद्रमणी सांगवीकर यांच्या उपस्थितीत भाऊराव चव्हाण यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी भाऊराव चव्हाण यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील सामाजिक व संघटनात्मक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून समाजातील वंचित, दुर्बल व उपेक्षित घटकांच्या प्रश्नांसाठी प्रभावीपणे कार्य करत पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, अशी अपेक्षाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

भाऊराव चव्हाण यांच्या निवडीबद्दल अमळनेर तालुकाध्यक्ष डी. एम. पाटील तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यांच्या नियुक्तीचे पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून उत्साहात स्वागत करण्यात येत आहे.

