वाढदिवसाचा अनोखा उपक्रम; वावडेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप.

0

अमळनेर/आबिद शेख
अमळनेर : वाढदिवसाचा आनंद सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा प्रेरणादायी उपक्रम तालुक्यातील वावडे येथे राबविण्यात आला. वावडे हायस्कूलचे सेवानिवृत्त वरिष्ठ लिपिक मणिलाल लोटन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद मराठी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
वावडे विकास सोसायटीचे चेअरमन दीपक पाटील यांनी आपल्या वडिलांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा सामाजिक उपक्रम आयोजित केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रगतीस हातभार लागावा, या उद्देशाने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

या कार्यक्रमास रडावण येथील लोकनियुक्त सरपंच भैय्यासाहेब पाटील, राजेंद्र प्रल्हाद ठाकरे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र फकिरा पाटील, आवास संस्थेचे अध्यक्ष अशफाक शेख, लिलाधर माळी, किशोर ठाकरे आदी उपस्थित होते.

तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता बाबुलाल बिऱ्हाडे, उपशिक्षक समाधान छगन खैरनार, कविता मोतीलाल खैरनार, पाकिजा बाबुलाल पिंजारी यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


वाढदिवसासारख्या आनंदाच्या प्रसंगी सामाजिक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे करण्याचा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी सांगत दीपक पाटील व त्यांच्या परिवाराचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed