अमळनेरात बालरंगभूमी परिषदेतर्फे लोककला प्रशिक्षण शिबिर व ‘जलोष लोककलेचा २०२६’चे आयोजन.

0

अमळनेर /आबिद शेख 


अमळनेर : बालरंगभूमी परिषद, जळगाव जिल्हा शाखा आणि मराठी वाङ्मय मंडळ, अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने अमृत महोत्सवी वर्ष २०२६ निमित्त विविध लोककला उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. “लोककला जपूया… संस्कृती रुजवूया…” या संकल्पनेतून लोककला प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

हे प्रशिक्षण शिबिर दि. ४ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११ वाजता मराठी वाङ्मय मंडळाच्या नांदेडकर सभागृहात, स्टेशन रोड, अमळनेर येथे होणार आहे. या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व बालकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

प्रवेशासाठी इच्छुकांनी श्री. भैय्यासाहेब मगर (९४२३९०४४८३) तसेच श्री. संदीप घोरपडे (९४२२२७९७१०) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


दरम्यान, दि. १९ व २० सप्टेंबर २०२६ रोजी ‘जलोष लोककलेचा २०२६’ या विशेष लोककला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. “चला उधळूया लोकरंग…!” या उत्साहपूर्ण संकल्पनेतून होणाऱ्या या उपक्रमामध्ये समूह लोकनृत्य, समूह लोकगीत गायन, एकल लोकगीत गायन, एकल लोकनृत्य तसेच एकल लोकवाद्य वादन अशा विविध स्पर्धांचा समावेश असणार आहे.
स्पर्धेतील उत्कृष्ट सहभागी व विजेत्यांना स्मृतिचिन्हासह आकर्षक रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी सचिन महाजन (७६२०९३३२९४), मोहित पाटील (९०६७३०४७९७) आणि हर्षल पवार (८८३०२५६०६८) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed