आरिफ भाया यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड.
अमळनेर/आबिद शेख

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संघटन विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत मा. आरिफ भाया यांची जळगाव जिल्हा उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही जबाबदारी पक्षाचे नेते तथा मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री आणि अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यावर सोपविण्यात आली.

आरिफ भाया यांना नियुक्तीपत्र पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आले. पक्षाप्रती असलेली निष्ठा, संघटन बळकट करण्यासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य तसेच तळागाळातील कार्यकर्त्यांशी असलेला घनिष्ठ संपर्क याची दखल घेत त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
नियुक्तीनंतर बोलताना आरिफ भाया यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. “पक्षाने माझ्यावर दाखविलेला विश्वास सार्थ ठरवत जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी तसेच जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव तत्पर राहीन,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
आरिफ भाया यांच्या निवडीबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.
