दिल्लीतील विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ अमळनेरात प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून व्यक्त केला निषेध.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर, प्रतिनिधी : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात विविध मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य प्राध्यापक महासंघ (एन.मुक्टो.) स्थानिक शाखेच्या वतीने धनदाई कला व विज्ञान महाविद्यालय, अमळनेर येथे निषेध आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनादरम्यान महाविद्यालयातील प्राध्यापकांनी काळ्या फिती लावून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदविला. विद्यार्थ्यांना शांततापूर्ण आंदोलन करण्याचा घटनात्मक अधिकार असून त्यावर अशा प्रकारची कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचविणारी असल्याची भूमिका स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव यांनी मांडली. तसेच विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याऐवजी त्यांच्यावर बळाचा वापर करणे ही निषेधार्ह बाब असल्याचे मत एन.मुक्टो.चे जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील यांनी व्यक्त केले.
यानंतर प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांना निषेधाचे निवेदन सादर करून विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध व्यक्त केला.
यावेळी एन.मुक्टो. स्थानिक शाखेचे अध्यक्ष डॉ. भगवान भालेराव, सचिव डॉ. महादेव तोंडे, जिल्हा सचिव डॉ. लीलाधर पाटील, उपप्राचार्य डॉ. जयवंतराव पाटील, डॉ. किशोर पाटील, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. रमेश पावरा, डॉ. संगीता चंद्राकर, डॉ. प्रवीण पवार यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed