अमळनेरात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’; नागरिकांनी लाभ घ्यावा.

0

अमळनेर/आबिद शेख 


अमळनेर  : महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने महसूल सेवा अधिक लोकाभिमुख, पारदर्शक व गतिमान करण्याच्या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर’ शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता अमळनेर येथील इंदिरा भवन, स्टेट बँकेच्या मागे आयोजित करण्यात आले आहे.


महसूल व वन विभागाच्या दि. ५ जुलै २०२६ च्या शासन निर्णयानुसार शासनाच्या विविध महसूलविषयक योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच दिवंगत माजी उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या शिबिराचे अध्यक्षस्थान अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील भूषविणार असून, जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या खासदार स्मिताताई वाघ या प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
महसूल विभागाशी संबंधित विविध समस्या, अर्ज, दाखले व इतर प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांना एकाच ठिकाणी मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून देण्याचा या शिबिराचा उद्देश आहे. अमळनेर विधानसभा मतदारसंघातील सर्व नागरिकांनी या शिबिरास उपस्थित राहून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed